बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात चांगली वाढ झाली आहे. अजित पवार यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात याबाबत माहिती दिली आहे. गेल्या पाच वर्षात अजितपवार यांच्या संपत्तीत १० कोटींनी वाढ झाली आहे. ३७ कोटी १५ लाख ७० हजार २९ रुपये स्थावर, तर ८ कोटी २२ लाख ६० हजार ६८० रुपयांची जंगम मालमता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी २७ कोटीपेक्षा अधिक किमतीची मालमत्ता जाहीर केली होती. तसेच २० ठिकाणी जमीन, चार निवासी इमारती, एक व्यापारी संकुल इमारत, दोन ट्रॅक्टर, चार ट्रेलर अशी जंगम मालमत्ता असून, यंदा एका ट्रेलरची वाढ झाली आहे. तसेच प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे पवार यांच्याकडे सात लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम आहे. २०१९ च्या तुलनेत स्थावर मालमत्तेत १० कोटी रुपयांनी वाढ होत ३७ कोटी १५ लाख ७० हजार २९ रुपये इतकी स्थावर, तर आठ कोटी २२ लाख ६० हजार ६८० रुपयांची जंगम मालमता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
अजित पवार यांनी वैयक्तिक १ कोटी ७ लाख ९२ हजार १५५ रुपयांची विमापत्रे, डाक बचतीत गुंतवणूक केली असून, २४ लाख ७९ हजार ७६० रुपयांचे शेअर, बंधपत्र (बाँड), तर तीन कोटी ९ लाख ६९ हजार ५३ रुपयांच्या बँकांमध्ये ठेवी असल्याचे स्पष्ट केले आहे. २०१९ मध्ये अजित पवार यांच्यावर वैयक्तिक एक कोटी पाच लाख रुपयांचे कर्ज होते. तुलनेने बंदा कर्जात वाढ झाली आहे. २०२४ मध्ये ४ कोटी १० लाख ८६ हजार ७५५ रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले आहे.
तसेच, सोने-चांदीबरोबर हिल्याचे दागिने वाढले आहेत. अजित पवार यांच्याकडे सद्यस्थितीला ३८ लाख १ हजार ५३२ किमतीचे सोने-बांदी आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, चांदीची भांडी, भेटवस्तू चांदीच्या मूर्ती आणि हिव्यांचे दागिने असल्याचे जाहीर केले आहे. तर, २०१९ मध्ये वैयक्तिक १३ लाख रुपयांचे सोने, चांदीचे दागिने असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. ही वाढ दुप्पट झाली आहे.