Pune News : पुणे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते (Ajit Pawar, the Leader of the Opposition) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील वेल्हे (Velhe) तालुक्याचं नामांतरण राजगड (Rajgad Subdistrict) तालुका असं करावं, त्यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी पत्रामार्फत (requested) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, and Revenue Minister Radhakrishna Vikhe Patil) यांच्याकडे केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे. (Ajit Pawar)
सरकारला लिहिलेल्या पत्रात अजित पवार यांनी म्हटले आहे की, स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे राज्य कारभार चालवला आहे. वेल्हे तालुक्यातील नागरिकांच्या भावना राजगड किल्ल्याशी जोडल्या गेल्या आहेत. म्हणूनच वेल्हे तालुक्याचं नामकरण हे राजगड करण्यात यावं, अशी नागरिकांची तीव्र इच्छा आहे.
पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नामांतरण राजगड तालुका असं करावं, त्यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, अशी मागणी पत्रामार्फत मुख्यमंत्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आणि महसूल मंत्री @RVikhePatil जी यांच्याकडे केली आहे. pic.twitter.com/66r98fxtWu
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 27, 2023
याबाबत तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींपैकी ५८ ग्रामपंचायतींनी नामकरणासाठी सकारात्मक ठराव दिला आहे. पुणे जिल्हा परिषदेनेही तसा ठराव केलेला आहे. वेल्हे तालुका हा शिवकालीन आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला तसेच स्वराज्यात महत्वाचे ठरलेले राजगड आणि तोरणा हे दोन किल्ले असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्तऐवज पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने तालुक्याची ओळख होती.
अजित पवार यांनी दिलेल्या पत्रानुसार..
उपरोक्त विषयान्वये पुणे जिल्हयातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड तालुका करणेबाबत लोकभावना तीव्र आहेत. याबाबत जिल्हा परिषद पुणे यांचे दि. २२.११.२०२१ रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव करुन वेल्हे तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी ५८ ग्रामपंचायतींनी वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे करणेबाबत सकारात्मक ठराव दिले आहेत. वेल्हे तालुक्यामध्ये स्थित असलेल्या राजगड या किल्ल्याशी तालुक्यामधील तमाम नागरिकांचे जिव्हाळयाचे संबंध असून सदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम राजधानी असल्यानं सदर ठिकाणावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांनी २७ वर्षे शासन चालविले असल्याने वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड असे करण्यात यावे अशी वेल्हे तालुक्यातील नागरिकांची तीव्र इच्छा आहे.
वेल्हे तालुका हा शिवकालीन व ऐतिहासिक वारसा असलेला आणि किल्ले मालिकेतील किल्ले राजगड व किल्ले तोरणा असे दोन महत्वपूर्ण किल्ले समाविष्ट असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्त पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने तालुक्याची ओळख होती. तथापि, सदर तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बु. घेरा या ठिकाणी असलेने तालुक्याचे नाव वेल्हे असे नमूद आहे. वेल्हे तालुक्यातील तमाम नागरिकांच्या भावना या राजगड किल्ल्याशी जोडलेल्या असून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी या तालुक्यामध्ये स्थित असल्याने किल्ले राजगड वरुन या तालुक्याचे नामकरण “राजगड” करणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी, ही विनंती.
अजित पवार, विरोधीपक्ष नेते
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यापूर्वी वेल्हे तालुक्याचं नामांतरण राजगड करण्यात यावं अशी मागणी केली होती.