पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी होऊन अजित पवारांच्या नेतृत्वातील गट भारतीय जनता पक्ष -एकनाथ शिंदे गटाबरोबर सत्तेत सहभागी झाला. या फुटीनंतर आता विधानसभा आणि लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून कोण कोणत्या जागा लढवणार आणि कोणत्या जागेवर उमेदवार दिला जाणार नाही याच्या चर्चा जोरात सुरु आहेत. अशातच बारामती लोकसभा मतदारसंघातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना लोकसभेला बघायला मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला. याबाबत अजित पवार यांना विचारलं असता, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
सुनेत्रा पवार या बारामतीतून निवडणूक लढवणार का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, “आम्ही त्यावर विचार करू. जेव्हा वेळ जेईल तेव्हा त्या त्या गोष्टीचा विचार केला जाईल.”
खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
दरम्यान, बारामतीतून सुनेत्रा पवार लोकसभेला लढणार असल्याच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. आपण लोकशाही मानतो. त्यामुळे कुणी ना कुणी माझ्याविरोधात लढणारच आहे. त्यामुळे अशा निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली होती.
हेही वाचा: