बारामती : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) मतदान पार पडले. आता या निवडणुकीचे निकाल शनिवारी (दि.23) जाहीर केले जाणार आहेत. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती न्यायालयाने समन्स बजावले आहे. 2014 च्या निवडणुकांमध्ये केलेल्या एका विधानामुळे बारामतीच्या न्यायालयाकडून हे समन्स बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी 2014 मध्ये अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात याचिका दाखल केली होती. सुरेश खापडे यांनी 2014 मध्ये आम आदमी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी देखील त्यांनी यासंदर्भात तक्रार केली होती. खोपडे यांच्या तक्रारीनुसार, बारामती न्यायालयाने आता अजित पवारांना हे समन्स बजावलं आहे. त्यामुळे त्यांना 16 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित पवार यांना बारामती न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. आता 16 डिसेंबर रोजी अजित पवार यांना कोर्टात हजर राहून आपली बाजू मांडावी लागणार आहे.
अजित पवारांच्या अडचणी वाढल्या…
अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अजित पवार यांना बारामती न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. आता 16 डिसेंबर रोजी अजित पवार यांना कोर्टात हजर राहून आपली बाजू मांडावी लागणार आहे.
काय केलं होतं विधान?
2014 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान एका गावातील लोकांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावचे पाणी बंद करु, अशी एकप्रकारे धमकीच दिली होती. ‘तुमचा पाणीप्रश्न दोन महिन्यांत सोडवतो. मात्र, मतदान आम्हालाच करा’, असेही अजित पवार यांनी म्हटले होते.