Ajit Pawar | बारामती, (पुणे) : लोकांचं लक्ष महत्त्वाच्या विषयांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी राज्य सरकार असे काहीतरी विषय समोर आणत असल्याची टीका अजित पवारांनी केली आहे.
बारामती येथे रविवारी (ता. २३) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यापुढे बोलताना अजित पवार म्हणाले, हे सरकार येऊन दहा महिने झाले आहेत. विरोधी पक्ष सातत्याने वेगवेगळ्या मुद्द्यांवर आवाज उठवत आहेत. वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून अनेक मुद्दे हाती घेतले जात आहेत. सत्ताधाऱ्यांकडून महाविकास आघाडीला भेगा पडल्या असे म्हटले जाणारच. ४३ मंत्री मुख्यमंत्र्यांच्या सहीने घेता येतात.
पहिले काही दिवस हे दोघेच मंत्री होते. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार केला. आत्ता फक्त २० च मंत्री आहेत. अजून २३ लोकं मंत्रीमंडळामध्ये भरली नाहीत. राज्यमंत्री कोणालाही केले नाही. एकाही महिलेला मंत्री केले नाही, हे घडलं आहे की नाही? असा उलट सवाल करत पवार पुढे म्हणाले,
दरम्यान, हे द्यायचं सोडून आणि तिसरच काहीतरी विचारायचं. लोकांचं लक्ष महत्त्वाच्या विषयांवरून दुसरीकडे वळवण्यासाठी राज्य सरकार असे काहीतरी विषय समोर आणत आहे.