पुणे : दिवाळी सणानिमित्त दरवर्षी पवार कुटुंब बारामतीत सहकुटुंब एकत्र येत दिवाळी साजरी करतात. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करून सत्ताधारी पक्षांशी हातमिळवणी केल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. या घटनेनंतरची पवार कुटूंबाची ही पहिलीच दिवाळी असल्याने, या दिवाळीत शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार का, याची सर्वांनाच उत्सुकता होती.
दरम्यान, शनिवारच्या एका कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्रित दिसले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अजितदादा आपल्या बहिणीला दिवाळीचे काय गिफ्ट देणार, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. स्पष्टीकरण दिलं आहे. यंदाच्या दिवाळीत दादा आपल्या बहिणीला काय गिफ्ट देणार हे मला माहिती नाही. तुम्ही हा प्रश्न दादालाच विचारा… असे सांगून सुप्रिया सुळे यांनी प्रश्नाला पूर्णविराम दिला.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामतीतील एका कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच व्यासपीठावर दिसले. त्यापूर्वी प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. आता दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सर्व पवार कुटुंबीय एकत्र येणार आहे. त्यामध्ये अजित पवार सहभागी होणार का, असा प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचे वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाहीत.
जेव्हा आपले वय वाढते तेव्हा वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे. आमची लढाई व्यक्तिगत नाही. राजकीय मतभेद आहेत, पण भाजपच्या अनेक नेत्यांशी आमचे संबंध आहेत. दादा कार्यक्रमात मास्क लाऊन बसले होते, त्यामुळे त्यांना भेटण्याची मुभा आहे का नाही हे डॉक्टर ठरवतील. तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हे शरद पवारांचे टॉनिक आहे असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, शरद पवारांचा ओबीसी दाखला व्हायरल होत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जो दाखल दाखवला जोतो, तो इंग्लिशमध्ये आहे. पवारसाहेब शाळेत होते तेव्हा शाळेत इंग्लिश होते का? हे सगळे हास्यास्पद असून, बालिशपणा आहे. शरद पवारांना डॉक्टरांनी सांगितले आहे की घरी लोकांना भेटू शकता, पण प्रवास टाळावा. त्यामुळे पुढील दोन दिवस ते सगळ्यांची भेट घेणार आहेत.