पुणे : तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिलं तर माझी जबाबदारी वाढणार आहे. उद्या बायकोनं काम करून दे म्हटलं तर सकाळी उठून करून द्यावेच लागेल, नाहीतर काही खरं नाही, असं अजित पवार म्हणाले. ते मंगळवारी रात्री बारामती लोकसभा मतदार संघामध्ये येणाऱ्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात प्रचारार्थ नागरिकांच्या आणि युतीच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत होते. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले, या गावाची ८० टक्के जागा एनडीएसाठी घेतली आहे. आता बंधन आणि तोडगा काढायचा आहे. हे केव्हा निघेल, जेव्हा संरक्षण मंत्र्यांचा विचाराचा खासदार ज्या वेळेस जाईल, तेव्हा मिळेल. आम्ही म्हणतोय घड्याळाला मतदान करा म्हणजे आपोआप होईल. तुम्ही निवडून दिलेल्या विरोधी पक्षाच्या खासदाराच तिथं चाललंच नाही. आता त्यांना सोडलं. आम्हाला सोडून गेले. आम्ही आमचा पक्ष ठेवला, असं अजित पवार म्हणाले.
सुनेत्रा पवार खासदार झाल्याचा तुम्हाला फायदा होईल. त्यांच्या माध्यमातून माझा तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही माझ्या बायकोला निवडून दिले तर मी तुमचा पालकमंत्री आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पीएमआरडीए, जिल्हा परिषद, राज्य सरकारचा निधी असणार आहे. ही सर्व माझी पण जबाबदारी आहे. उद्या बायकोने घरी म्हटले, हे काम करुन द्या, तर मला ते करुन द्यावेच लागेल. नाहीतर माझं काही खरं नाही, असं अजित पवार म्हणाले.