Ajit Pawar News : पुणे: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे लोकसभा मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे याजागेवर काँग्रेस दाव केला असताना राष्ट्रवादीने देखील अप्रत्यक्षपणे दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये यावरुन वाद रंगणार अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Indirect claim of NCP on Pune Lok Sabha seat; Will there be a dispute between Congress and NCP?)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पुण्याच्या टिंबर मार्केटला भेट दिली. तिथे लागलेल्या आगीनंतर मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं होतं. (Ajit Pawar News) त्याची पाहणी अजित पवारांनी आज केली. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा अजित पवारांनी व्यक्त केली. यावेळी इतर कोणतीही राजकीय भूमिका मांडण्यास त्यांनी नकार दिला असला, तरी राज्यातील आगामी निवडणुकीबाबत त्यांनी यावेळी मोठे विधान केले आहे.अजित पवार आज रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीसाठी पुण्यात हजर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचीही महत्त्वपू्र्ण बैठक आयोजित करण्यात आल्याचं बोललं जात होतं. (Ajit Pawar News) यासंदर्भात माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता अशी कोणतीही बैठक आयोजित करण्यात आली नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.
“कसली राष्ट्रवादीची बैठक, कोण सांगतं तुम्हाला? तुम्हाला ही धादांत खोटी माहिती मिळाली आहे. अशी कोणतीही बैठक आयोजित करण्यात आलेली नाही. (Ajit Pawar News) रयत शिक्षण संस्थेच्या तीन वर्षांसाठी नेमणुका होतात. वेगवेगळ्या विभागातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी आहेत. त्यासाठीची बैठक आहे”,असे अजित पवार म्हणाले.
कसबापेठ लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता?
दरम्यान, पुण्यातील कसबापेठ लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता यावेळी अजित पवारांनी बोलून दाखवली. “मला एक बातमी अशीही कळली आहे.(Ajit Pawar News) मला वाटत होतं की लोकसभा निवडणुकीला एक वर्ष राहिलंय. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही. पण बहुतेक पुण्यातील कसबा पेठ लोकसभा मतदारसंघात गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातली माहिती आहे”,असे अजित पवार म्हणाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : एचडीएफसी बँकेच्या रिलेशन मॅनेजरनेच घातला १ कोटी ६५ लाखाला गंडा
Pune News : पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच
Pune News : आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या ’उजास’ उपक्रमांतर्गत पथनाट्य सादर