Ajit Pawar News : पुणे : पुणे शहरातील भवानी पेठ येथील टिंबर मार्केटमध्ये लागलेल्या आगीत लाकूड साहित्याचे सात आठ गोडाऊन आणि चार घरे जळून खाक झाली आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज दुर्घटनेच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली तसेच नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नुकसान ग्रस्तांना प्रशासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना दिले आहेत. अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. (Directed the administration to help the burn victims in the timber market in Pune : Ajit Pawar)
दुर्घटनेच्या ठिकाणाचीअजित पवार यांनी केली पाहणी
पुण्यातील टिंबर मार्केट लाकूड साहित्य खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सतत वर्दळ असते. त्या पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी येथील मार्केट दुसर्या ठिकाणी करण्याचे नियोजन होते. (Ajit Pawar News) मात्र ते काही कारणास्तव होऊ शकले नाही. पण आता येथील लोकांनी कुठे जागा असल्यास त्याबाबत सांगावे. त्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. तसेच या आग लागलेल्या घटनेमध्ये कोणीही राजकारण आणू नये. येथील व्यापाऱ्यांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे. त्या दृष्टीनेदेखील पोलिसांनी तपास करावा आणि या सर्वांचा व्यवसाय, घरे कशी उभी राहतील यासाठी विशेष सर्व प्रयत्न झाले पाहिजे, अशी भूमिका अजित पवार यांनी यावेळी मांडली.
आग विझवण्यासाठी योगदान दिलेल्या अग्निशमन, पोलिस, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे पवारांनी कौतुक केले व आभार मानले. (Ajit Pawar News)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ajit Pawar News : निवडणुकांमध्ये बटन दाबताना महागाई लक्षात ठेवा : अजित पवार