Ajit Pawar News : बारामती : राजकीय क्षेत्रात नेहमी अचूक नेम धरणारे नेते, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अन् राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची ख्याती आहे. आज त्यांनी प्रत्यक्ष धनुष्यबाण हातात घेऊन अचूक निशाणा साधला. धनुष्यबाणमधील त्यांचा नेम लक्ष्यावर होता. त्यामुळे त्यांच्या एकाग्रतेचेही उपस्थितांनी कौतूक केले.
निमित्त होते अजित पवार यांच्या बारामती दौऱ्याचे! या दौऱ्यात त्यांनी सकाळी ६ वाजता पहिल्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर कन्हेरीत सुरु असलेल्या वन उद्यानाची पाहणी केली. विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात नेहमीप्रमाणे अजित पवार यांच्या जनता दरबाराचे आयोजन केले होते. बारामतीमधील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली.
त्यांच्या एकाग्रतेचे उपस्थितांनी केले कौतुक
या दौऱ्यात एन्व्हायरमेंट फॉर्म ऑफ इंडिया संस्थेच्या एका कार्यक्रमाला अजित पवार यांनी हजेरी लावली. या संस्थेने आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीट कार्यक्रमात विविध खेळांचे आयोजन करण्यात आलेले आहे. (Ajit Pawar News) यावेळी अजित पवार यांनी धनुष्यबाण हातात घेऊन अचूक निशाणा साधला. राजकीय क्षेत्रात नेहमी अचूक नेम धरणारे अजित पवार प्रत्यक्ष धनुष्यबाण हातात घेऊन अचूक निशाणा साधला. धनुष्यबाणमधील नेम हा त्यांचा लक्ष्यावर होता. त्यामुळे त्यांच्या एकाग्रतेचेही कौतूक उपस्थितांनी केले.
बारामतीत एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाचा हॅप्पी स्ट्रीटस बारामती उपक्रमाचे उद्घाटन अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी हॅप्पी स्ट्रीटमध्ये विविध खेळांसह मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना पवार म्हणाले की, आपण बारामती बदलतोय. तुम्ही सगळे साथ देत असल्यामुळेच ते शक्य होत आहे. (Ajit Pawar News) बारामतीचं रुप पालटताना या रस्त्याचं काम हा पहिला प्रयोग आहे. तीन हत्ती चौक सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. सगळ्यांची साथ मिळाल्यामुळे आपण हे सर्व करु शकतो.
निसर्ग संवर्धनासाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरमचं काम कौतुकास्पद आहे. बारामतीतील विकासकामांमध्ये अदृश्य शक्ती आहेत. अनेक हात यामागे राबत असतात. पाण्याचा प्रश्न असला तरी पाणी काटकसरीने वापरा. पाण्याच्या बाबतीत नियोजन केलं आहे. निसर्ग संवर्धनासाठी एन्व्हॉर्यमेंटल फोरमचं काम कौतुकास्पद आहे.
शासनाप्रमाणे नागरिकांचीही काही जबाबदारी आहे. स्वच्छता, झाडांचं संगोपन करणे आवश्यक आहे. (Ajit Pawar News) झाडं लावून ती वाढवण्यावर भर द्या. चांगल्या आरोग्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे, यामुळे व्यायाम नियमित करा, असा संदेश देखील त्यांनी बारामतीकरांना दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Ajit Pawar News : उमेदवारीसाठी रस्सीखेच कराल तर आपल्या कानाखाली आवाज निघेल ; अजित पवारांचा इशारा..