पुणे : अजित पवार आणि शरद पवार दिवाळीनिमित्त एकत्र येणार का? असा सर्वांच्या मनात प्रश्न होता. मात्र गोविंदबागेत न जाता बारामतीतील काटेवाडी येथील धनी वस्तीला अजित पवारांनी भेट दिली. यावेळी त्यांनी देविदास काटे यांचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्यानं त्यांच्या घरी जाऊन सांत्वन करून पवारांनी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली. अजित पवारांनी काटेवाडीत सांत्वनपर भेट घेतली. त्यानंतर त्यांनी दिवाळीनिमित्त काटेवाडीत तयार करण्यात आलेल्या किल्ल्यांची पाहाणी केली.
दरम्यान, बारामतीतील काटेवाडी येथील देविदास काटे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झालं. अजित पवारांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. वडील अनंतराव पवार आणि दिनकर काटे यांचे चांगले संबंध होते. या निमित्तानं अजित पवार हे कुमार काटे यांच्या घरी गेले होते.
आजारातून सावरलेले अजित पवार सार्वजनिक कार्यक्रमांत हजेरी लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, आता ते दिवाळी पाडव्यानिमित्त गोविंदबागेत उपस्थित राहणार का? असा सर्वांच्या मनात प्रश्न होता. पण, गोविंद बागेत मात्र अजित पवार दिसले नाहीत, अशातच आता अजित पवार भाऊबिज कुटुंबासोबत एकत्र साजरी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.