नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुनावणीला सुरवात झाली असून शरद पवार गटाकडून बाजू मांडायला सुरुवात झाली आहे. अभिषेक मनु सिंघवी शरद पवार गटाची बाजू मांडत आहेत. यावेळी शरद पवार गटाकडून अजित पवार गटाकडून दोन हजारपेक्षा अधिक बोगस कागदपत्रे सादर केली आहेत. असा युक्तीवाद शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे. यावेळी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड तर अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर उपस्थित आहेत.
दरम्यान, अजित पवार गटाने दोन हजारांपेक्षा जास्त शपथपत्र सादर केली असून ती कागदपत्रे खोटी आहेत. त्या कागदपत्रातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही जण तर दुसऱ्या पक्षात आहेत. असा युक्तीवाद शरद पवार गटाने केला आहे.