Ajit Pawar | पुणे : आगामी काळात विधानसभेच्या २०२३ च्या निवडणुकांची वाट कशाला बघायची ? आताही मुख्यमंत्रीपद आमच्याकडे ठेवायची आमची तयारी, असे राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी एका वृत्तसमुहाच्या मुलाखतीत सांगितले. त्यात त्यांनी थेट मुख्यमंत्री होण्याचीच इच्छा बोलून दाखविली.
त्यानंतर एका रात्रीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार जनतेच्या मनातील मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकावले आहेत. त्यामुळे आता पु्न्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
कोथरुड भागातील जयभवानी नगर, शिवतीर्थनगर, पौड रोड या परिसरात हे बॅनर लावण्यात आले आहेत. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असे त्यावर नमूद केले आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे या भावी मुख्यमंत्री अशी चर्चा रंगली होती. तशा आशयाचे फ्लेक्सही झळकले होते. त्यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडे जाणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.
त्यानंतर अजित पवार यांच्या बंडांची चर्चा दोन तीन दिवस राज्याच्या राजकारणात रंगली होती. आपणच राष्ट्रवादीतील २ नंबरचे नेते आहोत, हे दाखविण्यासाठी हे सर्व प्रकरण रंगविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे..
दरम्यान, अजित पवार यांनी पिंपरीत एका मुलाखतीत आपल्या आताही मुख्यमंत्री होण्यास आवडेल, असे सांगितले. त्यानंतर कोथरुड येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष डोख यांनी रात्रीत कोथरुडमध्ये बॅनर झळकाविले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेली १८ वर्षे काम करीत असून अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत. त्यांच्या अंगी ती क्षमता आहे. त्यांचा अनुभव सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी इच्छा व्यक्त केल्याने बॅनरद्वारे त्यांनी शुभेच्छा दिल्याचे संतोष डोख यांनी माध्यमांना सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Ajit Pawar : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेला ३५१ कोटींचा ढोबळ नफा : अजित पवार
Ajit Pawar : मृतांच्या आकड्यात तफावत, खारगाव दुर्घटनेची चौकशी व्हावी : अजित पवार
Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांना अजित पवारांचे पत्र : ही केली मागणी