Ajit Pawar | पुणे : राज्याच्या राजकीय नेहमीच केंद्र स्थानी चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अखेर गणित सोडवले आहे.
मावळमध्ये अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या फ्युचरिस्टिक क्लासरूमचे उदघाटन झाले. यावेळी अजित पवार यांनी या क्लासरूमची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या डेस्कवर बसून क्लासरूम विषयी शिक्षकांना अनेक प्रश्न केले. अजित पवार हे विद्यार्थीच झाले होते. डिजिटल डेस्कटॉपवर गणिताचा सराव देखील केला.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष्य प्रसाद, आमदार सुनील शेळके, कान्हे फाटा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
अजित पवार हे आज पुण्यातील मावळ दौऱ्यावर आहेत. पुणे जिल्ह्यात पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेत फ्युचरिस्टिक क्लासरूम सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले.
कार्यकर्त्यांना दिला दम…
क्लासरूमध्ये कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यावेळी पवारांनी “हा कार्यक्रम मुलांसाठी आहे, की तुमच्यासाठी? तुम्ही बाहेर जाता की, मी बाहेर जाऊ?”, असा सज्जड दम त्यांनी दिला.
गर्दी कमी झाल्यानंतर अजित पवार यांनी विद्यार्थ्यांच्या डेस्कवर बसून डिजिटल क्लासरूमची माहिती घेतली. डिजिटल डेस्कटॉपवर अत्याधुनिक पेनाच्या साहाय्याने गणिताचा सराव देखील त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं. फ्युचरिस्टिक क्लासरूमसारखे डिजिटल क्लासरूमची गरज असल्याचे देखील त्यांनी म्हटलं आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Ajit Pawar : गौतमी पाटीलने बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो. अजित पवार म्हणाले…
Ajit Pawar : वेल्ह्याचे नामकरण राजगड करण्याची अजित पवार यांची शिंदे-फडणवीसांकडे मागणी..