पुणे: पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथे ४७ वी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली असून या सर्वसाधारण सभेपूर्वी नियामक मंडळाची बैठक होत आहे. या बैठकीला वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित आहेत.
तसेच या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ऐनवेळी पुन्हा एकदा अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत बैठकीला येणं टाळल आहे.
सहा महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या घटनेनंतर आजपर्यंत ज्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शरद पवार हे असतील, त्या ठिकाणी अजित पवार हे व्यासपीठावर जाण्याचे टाळत आहे. मात्र, आजवर वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट येथील कार्यक्रम आणि बैठकांना अजित पवारांनी हजेरी लावली होती.