पुणेः मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट या संपूर्ण मार्गावर तसेच भुयारी मार्गात एअरटेल मोबाईल नेटवर्क ५जी कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. याबाबत भारती एअरटेलचे महाराष्ट्र आणि गोवाचे सीईओ जॉर्ज मॅथेन यांनी सांगितले की, एअरटेलने ६ किमी भूमिगत मेट्रो मार्गात सातत्यपूर्ण कव्हरेजसाठी मेट्रो स्थानकांमध्ये समर्पित इन-बिल्डिंग सोल्यूशन्स तैनात केले आहेत.
नुकताच झालेल्या मार्गावर शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट ही नव्या स्थानके सामील आहेत. एअरटेलने १७.४ किमी मार्गावरील लक्षणीय साइट्स अपग्रेड केलेल्या आहेत. यामुळे ५ जी स्पीडचा, अखंड व्हॉईस कॉल्सचा आणि डेटा ट्रान्समिशनचा आनंद प्रवाशांना प्रवास करताना घेता येणार आहे.