पुणे : पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर असणाऱ्या लिकर लीजर लाउंज हॉटेलवर पतित पावन संघटनेकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. शनिवारी (दि. २३) पहाटेपर्यंत एल थ्री या बारमध्ये पार्टी सुरू असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यानंतर त्या हॉटेलवर पोलिसांनी कारवाई देखील केली.
तसेच सामाजिक संघटनांकडून आक्रमक पवित्रा घेत एल थ्री या बारवर थेट दगडफेक केली आहे. लिकर लीजर लाउंज या हॉटेलच्या स्वछतागृहामध्ये ड्रगचे सेवन करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. याचाच निषेध करत पतीत पावन संघटनेकडू बारची आज तोडफोड करण्यात आली आहे.
दोन पोलीस अधिकारी निलंबित
दरम्यान, एल ३ हॉटेलमधील मध्यरात्री चालणारी पार्टी आणि ड्रग्ज सेवन प्रकणारात शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अनिल माने आणि सहायक पोलीस निरिक्षक दिनेश पाटील यांना देखील निलंबित करण्यात आले आहे. हे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
पुणे शहरातील डेक्कन परिसरातील एल थ्री लिक्विड लेजर लाऊंज या हॉटेलमध्ये पहाटेपर्यंत मद्य पार्टी आणि त्यामधून ड्रग्ज सेवन सुरू असल्याचे व्हिडीओ समोर आले होते. या प्रकारानंतर पुणे पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दुर्लक्षामुळे हे सर्व प्रकार अद्याप देखील सुरू असल्याचे उघड झाले आहे.