यवत / राहुलकुमार अवचट : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात उच्च न्यायालयात शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत साळुंखे यांनी कॅव्हेट न्यायालयात दाखल केले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने काढलेल्या २६ जानेवारी रोजी शासनाच्या अधिसूचनेस कोणी न्यायालयात याचिका दाखल केली तर आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय या अधिसूचनेस स्थगिती अथवा अधिसुचना रद्द करण्याचा एकतर्फी निर्णय देऊ नये म्हणून हे कॅव्हेट दाखल करण्यात आल्याचे शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंत साळुंखे यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या नव्या अधिसूचनेविरोधात याचिका करण्यात आली आहे, अशी माहिती अर्जदारांचे वकील अक्षय कापडिया यांनी दिली. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी काढलेल्या विराट पदयात्रेनंतर राज्य सरकारने आंदोलकांची मागणी मान्य करत कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजाच्या नागरिकांना व सग्यासोयऱ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी अधिसूचना काढली.
या अधिसूचनेविरोधात हरकती नोंदविण्याचा तसेच न्यायालयात दाद मागण्याचा पवित्रा अॅड.गुणरत्न सदावर्ते , जयश्री पाटील, अॅड. मंगेश ससाणे यांनी घेतला असल्याने या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयात कॅव्हेट अर्ज दाखल करण्यात आल आहे