यवत येथील आदर्शमाता सोनाबाई चाफेकर यांचे निधन
राहुलकुमार अवचट
यवत : यवत येथील चाफेकर कुटुंबीयातील एक आदर्श माता व जुन्या पिढीतील सोनाबाई रामचंद्र चाफेकर ( वय- १०२ वर्षे) यांचे २६ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. यवत व परिसरातील १०० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींपैकी त्या एक होत्या. जुन्या काळात मिरची कांडप चालवून घरातील कमावती महिला बनल्या होत्या. त्यावेळी त्यांनी टेस्टी बाईट कंपनीचे मसाला कुटून देण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले होते. यावर त्यांनी अनेक वर्षे कुटुंब चालविले.
यवत येथील शगुन टेलर्संचे मालक सूर्यकांत चाफेकर व जुने मंडप व्यावसायिक चंद्रकांत चाफेकर यांच्या त्या मातोश्री, तर दैनिक लोकमतचे पत्रकार व दौंड तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संदीप चाफेकर, प्रकाश चाफेकर, विकास चाफेकर, आनंद चाफेकर, सागर चाफेकर, जितेंद्र सुतार व मयूर चाफेकर यांच्या त्या आजी होत.