उरुळी कांचन, (पुणे) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षाची सोशल मीडियावर बदनामी केल्याबद्दल अजय माने व गुलाब चौधरी या दोघांची चौकशी करून कारवाई करावी या मागणीचे निवेदन जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन यांनी लोणी काळभोर पोलिसांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनानुसार, चिंचवड येथील विधानसभेच्या पोटनिवडनुकीत प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फ्लेक्स लावण्यात आले होते. त्या फोटोत बदल करून चुकीच्या पद्धतीने समाज माध्यमावर सोशल मीडियातून प्रसारित करून मुख्यमंत्री यांचा अवमान करण्यात आला आहे.
त्यामुळे समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे तरी अजय माने व गुलाब चौधरी यांच्यावर गुन्हा नोंद करून सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावी असे निवेदन जिल्हाप्रमुख उल्हास तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, शिवसेना तालुकाप्रमुख विपुल शितोळे, युवा नेते गणेश सातव, उपजिल्हाप्रमुख शामराव माने उपतालुकाप्रमुख हरीश कांचन, तालुकाप्रमुख दीपक लोणारी, वैद्यकीय कक्ष प्रमुख अभिषेक पवार, विभाग प्रमुख अनिल शिंदे, उपशहर प्रमुख अमोल ननवरे, यासह पदाधिकारी उपस्थित होते.