हडपसर : आगामी काळात पुणे शहरात गणेशोत्सव साजरा होत आहे. त्या अनुषंगाने अवैध धंदे वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार अवैद्य दारूची वाहतूक करणाऱ्या टॅम्पोवर हडपसर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आहे. या कारवाईत 19 प्लॅस्टीकचे हत्ती कैन्ड त्यामध्ये अंदाजे ७०० लिटर गावठी हातभट्टीची दारू, टॅम्पो असा एकूण 2 लाख 47 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई हडपसर परिसरातील 15 नंबर चौक येथे सापळा रचून करण्यात आली.
याप्रकरणी राहुल दामोदर बनसोडे (वय 42), सोमनाथ पोपट कांबळे (वय-22 दोघेही रा. काळुराम मंदीराजवळ, सिद्राम मळा, लोणीकाळभोर) यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर तपास पथकातीत अंमलदार श्रीकांत पांडुळे, भगवान हंबर्डे, चंद्रकांत रेजितवाड हे पहाटेच्या सुमारास पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार श्रीकांत पांडुळे यांना गोपनीय बातमी मिळाली की, मारूती कॅरीअर वाहन क्रमांक एम एच 12 एस एक्स 7439 या वाहनातून अवैध दारूची वाहतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी 15 नंबर चौक येथे सापळा रचून सदरची गाडी अडवून पाहणी केली असता त्यामध्ये 19 प्लॅस्टीकचे हत्ती कैन्ड त्यामध्ये अंदाजे 700 लिटर गावठी हातभट्टीची दारू मिळून आली. आरोपींकडून टॅम्पो व गावठी दारू असा एकूण 2 लाख 47 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक कांबळे हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ 5 चे पोलीस उप आयुक्त आर राजा यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे, (गुन्हे) यांचे सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश रोकडे, पोलीस अंमलदार दिपक कांबळे, समीर पांडुळे, भगवान हंबर्डे, चंद्रकांत रेजितवाड यांचे पथकाने केली.