यवत : पुणे सोलापूर महामार्ग जवळील यवत गावाच्या मुख्य चौकात असलेल्या मोबाईल शॉपीचे शटर उचकटून चोरी करणारे आरोपी जेरबंद करण्यात गुन्हे शोध पथकाला यश आले आहे.
शुक्रवारी (दि. 18 मे) रोजी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग शेजारी असलेल्या यवत गावात जाणाऱ्या मुख्य चौकात दोन चोरट्यांनी रात्रीच्या वेळी राणी मोबाईल शॉपीचे शटर उचकटून दुकानातील दोन मोबाईल फोन व एक लाख दहा हजारांचा ऐवज चोरला होता. हा चोरीचा गुन्हा यवत पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता.
याबाबत यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने यवत परिसरातील सी.सी.टि.व्ही व रेकॉर्डवरील आरोपीचा शोध करत असता सदरचा गुन्हा हा भिवरी (ता पुरंदर) येथील रेकॉर्डवरील आरोपी अर्जुन शेलार व दिगंबर आंबरे यांनी केले. सदर दोघेजण भिवरी ( ता. पुरंदर) येथील कटके अमृततुल्य या हॉटेल मध्ये नसल्याची माहिती पत शोध पथकाला मिळाली.
यावरून पोलीस पथकाने दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. असता सदरचा गुन्हा अर्जुन उर्फ गुड्या महादेव शेलार (वय 20 रा. भिवरी, ता पुरंदर, जि पुणे) दिगंबर उर्फ चॉकलेट अकुंश आंबरे (वय 25 रा.नवले ब्रिज, अंबिकानगर, बिबवेवाडी पुणे) यांनी केला असुन चोरीस गेलेल्या एक मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आला असून पुढील तपास यवत पोलीस करत आहे.
सदरची कारवाई ही पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव , दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, पोलीस हवालदार निलेश कदम, गुरूनाथ गायकवाड, महेंद्र चांदणे, अक्षय यादव यांच्या पथकाने केली.