पुणे : तरुणावर वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हवेली पोलीस ठाण्यात दाखल केलेला आहे. या गुन्ह्यातील दोघांना पकडण्यात हवेली पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने दरोडा व वाहन चोरीच्या आरोपींना वारजे परिसरात पकडले आहे. हर्षद संदीप वांजळे (वय-१८, रा. औदुंबर कॉलनी, वारजे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीसह त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज हवेली पोलिसांनी सर्वत्र पोलीस ठाण्यामध्ये पाठविले होते. दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक गस्त घालत असताना, पोलीस अंमलदार साईकुमार कारके यांना अशी माहिती मिळाली की, खुनाचा प्रयत्न करुन पळून गेलेले आरोपी वारजेमधील आहेत. आणि ते नर्हे येथील बंद पडलेल्या बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये निवाऱ्याला थांबले आहेत. या मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी नर्हे येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई करण्यासाठी त्यांना हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दरम्यान, ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक पोलीस निरीक्षक प्रविण काळुखे, पोलीस अंमलदार हवालदार प्रदीप राठोड, धनंजय ताजणे, गणेश ढगे, बाळु गायकवाड, पोलीस नाईक रवींद्र लोखंडे, साईकुमार कारके, महेश पाटील, श्रीकांत दगडे, शिवाजी सातपुते, नारायण बनकर यांनी केली आहे.