पुणे : मुंबईहून रेल्वेने पुण्याकडे येत असताना आरोपी रेल्वेतून उडी मारून पसार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना पिंपरी चिंचवड येथील देहूरोड परिसरात १५ मे रोजी घडली आहे. विशाल हर्षद शर्मा असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल शर्मा हा एका गुन्ह्यातील आरोपी आहे. तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. १३ मे रोजी गुरुग्राम येथील न्यायालयात हजर करण्यासाठी विशालला नेण्यात आले होते.
१५ मे रोजी मुंबईहून रेल्वेने पुणे पोलीस आरोपीला घेऊन येत होते. त्यावेळी त्याने पोलिसांना चकवा देत बेडीसह देहूरोड परिसरात धावत्या रेल्वेतून उडी मारली. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.