पुणे : हडपसर पोलिसांच्या ताब्यातून आरोपी पळून गेल्याची घटना घडली आहे. या आरोपीला फिंगर प्रिंटसाठी लॉकअपमधून बाहेर काढण्यात आले होते. यावेळी त्याने पोलिसांची नजर चुकवून धूम ठोकली आहे. ही घटना आज दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास घडली. गराविंद उर्फ पिंट्या घोडके असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे.
हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात घोडकेला अटक करण्यात आली होती. शनिवारी दुपारी घोडकेला पोलीस ठाण्यातील कोठडीतून बाहेर काढण्यात आले. त्याच्या हाताचे ठसे घेण्याचे काम करण्यात येणार होते. त्यावेळी पोलिसांचे लक्ष नसल्याची संधी साधून घोडकेने खोलीतून धूम ठोकली. दरम्यान, पोलीस ठाण्यात उपस्थित असलेलेया पोलिसांनी तातडीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नसल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेनंतर वॉकीटॉकीवर मेसेज प्रसारित करण्यात आला आहे. तसेच परिसरात तातडीने नाकाबंदी ही लावण्यात आली आहे. आरोपीला शोधण्यासाठी त्याच्या नातेवाईक आणि मित्र पसिवाराकडे हडपसर पोलिसांचे पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच पळून गेलेल्या आरोपीचा शोध गुन्हे शाखेचे पथकही करत आहे.