(Accident News) शिक्रापूर : पुणे-नगर महामार्गावर कारेगाव जवळ ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात (Accident News) झाल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी (ता.१३) सकाळच्या सुमारास घडली आहे.
शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयात तब्बल २७ वर्षे ज्ञानदानाचे काम…
या अपघातात वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयात तब्बल २७ वर्षे ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे गावावर शोककळा पसरली आहे.
संजय सीताराम कदम (वय ४५, रा. पाबळ चौक शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. वाडेगव्हाण ता. पारनेर जि. अहमदनगर) असे अपघातात मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. तर ट्रॅक्टर चालक महेश किसन चव्हाण (रा. उंबरखेडा ता. कन्नड जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी राजेंद्र बाळासाहेब धुमाळ (वय ४३ रा. पिंपळे खालसा, ता. शिरुर) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कदम हे त्यांच्या दुचाकीवरून (क्र.एम एच १२ एल जि ७८५१) वाडेगव्हाण येथे आज सोमवारी सकाळच्या सुमारास निघाले होते.त्यांची दुचाकी कारेगाव नजीक आली असता, कदम यांना फोन आला. त्यानंतर त्यांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला घेतली. हेल्मेट काढून कदम मोबाईलवर बोलत असताना पाठीमागून भरधाव ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली.
धडकेत ते रस्त्याचे कडेला पडले. ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरुन गेले. या अपघातात कदम हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शिरुर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरांनी कदम यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी ट्रॅक्टर चालक महेश चव्हाण याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष पवार हे करत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Accident News : जुना पुणे-मुंबई महामार्गावर अपघात; भरधाव बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू