Accident News : खडकवासला, (पुणे) : वारजे परिसरातील बाह्यवळण महामार्गावर मुठा नदीच्या पुलावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका २३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (ता. ०७) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. हा अपघात कसा झाला याचा पोलीस शोध घेत आहेत. (23-year-old girl dies in collision with unknown vehicle; Incidents in Khadakwasla area..)
बाह्यवळण महामार्गावरील दुर्घटना
ऋतुजा दिलीप वायकर (वय- २३, रा.नऱ्हे आंबेगाव) असे त्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा बावधन येथून महामार्गावरून घरी निघाली होती. यावेळी अज्ञात वाहनाने तिला जोरदार धडक दिली. (Accident News) यामध्ये त्या मुलीच्या वाहनांचा पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. त्यावरून, अज्ञात वाहनाने धडक दिली असावी. असा अंदाज पोलिस निरीक्षक दगडू हाके यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दुचाकीच्या क्रमांकावरून तिच्या वडिलांशी संपर्ककरण्यात आला. (Accident News) ते तातडीने घटनास्थळी पोचले. तिला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. त्यावेळी तिचे वडील सोबत गेले आहेत.’ अशी माहिती वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक विशाल पवार यांनी दिली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : धक्कादायक! घोरपडीत अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल
Pune News : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावे पुन्हा बनावट फेसबूक अकाऊंट