पुणे : पुण्यातील कोंढवा भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. आईने जेवण करण्यासाठी घरी बोलवले असल्याचे सांगून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घटट नेऊन बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबत कोणाला सांगितले तर स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिली. ही घटना कोंढवा परिसरात २० नोव्हेंबर २०२३ ते ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी घडली आहे.
याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत कोंढवा भागातील कामठे पाटील नगर येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीने गुरुवारी ८ फेब्रुवारीला कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन विवेक रामकृष्ण निमकरडे (वय-१९ रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्यावर आयपीसी 376, 323, 506 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मुलगी येवलेवाडी येथील कॉलेजमध्ये शिकत आहे. मुलगी कॉलेजमध्ये असताना आरोपीने तुला माझ्या आईने जेवण करण्यासाठी घरी बोलवले असल्याचे सांगितले. तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून येवलेवाडी येथील त्याच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
मुलीने त्याला विरोध केला असता तिला मारहाण केली. तसेच याबाबत घरी काहीही सांगितले तर मी माझ्याच जीवाचं बरेवाईट करुन घेईल. तुला आणि तुझ्या घरच्यांना अडकविन अशी धमकी दिली. यानंतर दुचाकीवरुन घरी सोडले. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक बाबर करत आहेत.