Aashadhi Wari पुणे : आषाढी निमित्तअनेक भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. त्यासाठी २५ ते ३० जून दरम्यान आषाढीनिमित्त (Aashadhi Wari) भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदाच्या वर्षी पुण्याहून पंढरपूरसाठी ४७५ एसटी गाड्यांचे नियोजन केले आहे. (Aashadhi Wari) यात पुणे विभागाच्या २७५ तर अन्य विभागाच्या २०० गाड्यांचा समावेश आहे. (Aashadhi Wari) यंदा एसटीच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी असल्याने अन्य विभागांकडून अतिरिक्त गाड्या घेण्यात येत आहेत. (Aashadhi Wari) मुंबई, रायगड, पालघर विभागातून जादा बस मागविण्यात आल्या आहेत.(Aashadhi Wari)
२५ जून रोजी २४ जादा गाड्या सोडण्यात येतील. त्यानंतर दररोज जादा गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल. आषाढी एकादशीच्या दिवशी २७५ जादा बस जातील. शिवाजीनगर येथून २५ व स्वारगेट येथून ३० जादा बस धावतील. त्याबरोबरच बारामती (२७), इंदापूर (२८), सासवड (२१), शिरूर (२२) अशा जादा बस सोडल्या जातील.
प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून गाड्यांचे नियोजन
प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून सुमारे गाड्या सोडण्याचे नियोजन झाले आहे. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला तर गाड्यांच्या संख्येत वाढ केली जाईल, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली आहे.