योगेश पडवळ
Aambegaon News पाबळ : या वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे दुष्काळाला सामोरे जावे लागणार या भितीने आंबेगाव तालुक्यातील शेतकरी वर्ग चिंतातूर झाला होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार होत असल्याने पिकांना दिलासा मिळाला आहे. असे असले तरी शेती व्यवसायासाठी अधिकच्या पावसाची गरज आहे.
पिके तगण्यासाठी अधिक पावसाची अद्यापही गरज
गेल्या वर्षी या काळात जेमतेम पावसाने हजेरी लावली होती. त्या काळात खरीप हंगामातील पेरण्या झाल्या होत्या. सप्टेंबर महिण्यात कडधान्य विकून शेतकऱ्यांच्या हातात काही अंशी पैसा आला होता. (Aambegaon News) त्यामुळे शेतीतून आलेला फायदा शेतकऱ्यांना घेता आला. या काळात पाऊसाने बऱ्या पैकी हजेरी लावल्याने बाजरी सारखे पिक शेतावर डोलू लागले होते.
मात्र, या वर्षी जून, जुलै महिना कोरडा गेल्याने खरीपाच्या पेरण्या रखडल्या. काही शेतकऱ्यांनी ओल निर्माण करून बाजरीची पेरणी केली. या काळात कडधान्य पेरता न आल्याने त्या पेरण्या रखडल्या.(Aambegaon News) त्यामुळे कडधान्याच्या माध्यमातून कोणताही फायदा शेतकऱ्यांना घेता आला नाही. सगळा पावसाळा कोरडा जातो की काय या भीतीत शेतकरी चिंतातूर झाला आहे.
दुष्काळाची तीव्रता सोसत असलेला आंबेगाव तालुक्याचा पूर्व भागात शुक्रवारी (ता.०९) मध्यरात्री झालेल्या संततधार पावसाने तात्पुरता दिलासा मिळाला आहे. (Aambegaon News) यामुळे काही पिकांना याचा फायदा होणार आहे. या पावसाने थोड्या फार प्रमाणात चारा देखील होऊ शकतो. पण एका पावसाने काही होणार नसून दुष्काळी स्थिती हटण्यासाठी अजून अधिकच्या पावसाची गरज आहे.
दरम्यान, बटाटा, सोयाबीन, बाजरी, कडधान्य इ. राहिलेल्या पिकांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकरी आनंदी झाला आहे. (Aambegaon News) संपूर्ण मान्सून कोरडा गेल्याने जमिनीची पाणी शोषण क्षमता जास्त आहे. अशा पावसाने पिकांची मलमपट्टी होणार असली तरी त्यामुळे दुष्काळाची स्थिती कमी होणार नाही.
या मान्सूनच्या परतीच्या पावसाने थोड्याफार प्रमाणात शेतकरी सुखावला असला तरी पाणी साठा महत्वाचा आहे. शिरदाळे ( ता. आंबेगाव ) परिसरात बटाटा पिकाला या पावसाने जीवदान मिळाले आहे. संपूर्ण पावसाळ्यातील हा सर्वात मोठा पाऊस असला तरी अजून अधिकच्या पावसाची गरज आहे. जेणेकरून भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा, चाऱ्याचा प्रश्न मिटेल. दुष्काळ हटविण्यासाठी प्रदुषण होणार नाही. याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी झाडे लावण्यावर भर दिला पाहिजे.
मयुर सरडे (माजी उपसरपंच- शिरदाळे ता. आंबेगाव)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : लाखणगाव येथील अपघाती कुटूंबाच्या सांत्वनाला ‘ती’ ला ही अश्रु अवरेना…
Shirur News : डिंभा धरण ९५.८७ टक्के भरले ; घोडनदी पत्रातून २८०० क्युसेसने पाणीसाठा विसर्ग