पुणे : मुंबईतून अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने बाणेर भागातून अटक केली आहे. त्याच्याकडून चार लाख रुपये किंमतीचे २० ग्रॅम मेफेड्रोन, तीन मोबाइल संच, मोटार असा सात लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे.
असिफअली अलीमुद्दीन शेख (वय २६, रा. कुर्ला, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर भागात अमली पदार्थ विरोधी पथकाकडून गस्त घालण्यात येत होती. शेख हा अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचार्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडून त्याच्याकडून मेफेड्रोन, तीन मोबाइल संच, मोटार असा सात लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, संतोष देशपांडे, साहिल शेख, आझीम शेख, संदीप जाधव, संदीप जाधव, योगेश मांढरे, दिनेश बास्टेवाड, दिशा खेवलकर आदींनी केली आहे.