पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याने जात असलेल्यांना एका तरुणाने पाहिल्यावरुन माझ्याकडे काय पाहतो, असे म्हणून दोघांनी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना ६ सप्टेंबर रोजी अरण्येश्वर समाज मंदिरासमोर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी सोमनाथ कालिदास पवार (वय-२१, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साईनाथ लोंढे (वय-२१, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर) आरोपी आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घराजवळील अरण्येश्वर समाज मंदिर येथील परिसरात बसले होते. त्यावेळी त्यांच्या समोरून आरोपी जात होता. फिर्यादी यांनी त्यांच्याकडे पाहिले असता, साईनाथ पवार म्हणाला माझ्याकडे काय पाहतो, असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. दरम्यान, साईनाथ याने त्यांच्याकडील लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात मारहाण करुन त्यांना गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस हवालदार शिंदे करीत आहेत.