-सागर जगदाळे
भिगवण : भिगवण नजीक मदनवाडी गावच्या हद्दीत 45 वर्ष वयाच्या एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या आरोपी मित्राला भिगवण पोलिसांनी अटक केले आहे.
विजयकुमार विठ्ठलराव काजळे, (वय 45, रा. निरगुडे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण पोलीस स्टेशन हद्दीत मोजे मदणवाडी गावातील गायरान माळरानावर मृत व्यक्ती विजयकुमार काजळे आणि त्याचा मित्र राज भगवान शिंदे, (वय 20 वर्षे रा. मदनवाडी) हे दोघे रात्री एकत्र बसले होते. कोणत्यातरी कारणावरून दोन्ही मित्रांमध्ये कडाक्याचे भांडण होऊन आरोपी राज शिंदे याने विजयकुमार काजळे याच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून केला.
सदर मृतदेह आपुलकीची सेवा ॲम्बुलन्स च्या माध्यमातून पुढील कार्यवाहीसाठी भिगवन येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आला आहे.
सदर घटनेचा भिगवण पोलिसांनी कसोशीने तपास करून चार तासांच्या आत आरोपीला शोधून त्याला ताब्यात घेतले आहे. सदर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून अधिकचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.