पुणे : राहत्या घरात हातभट्टी दारु तयार करण्यासाठी भट्टी लावली. त्यातून ३ हजार लिटर रसायन तयार करुन हातभट्टी दारु विक्रीसाठी तयार केली. याप्रकरणी येरवडा येथील नाईकनगरमधील महिलेला सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. तिने तयार केलेले १ लाख ३४ हजार रुपयांचे ३ हजार लिटर रसायन पोलिसांनी जप्त केले आहे.
अटक केलेल्या महिलेचे नाव रुक्मिणी शंकर राठोड (वय ५०, रा. नाईकनगर, येरवडा) असे आहे. शोभा हिरा राठोड (वय ३५) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस शिपाई संदीप कोळगे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुक्मिणी व शोभा राठोड यांनी नाईकनगर येथील त्यांच्या राहत्या घरात हातभट्टी दारु तयार करण्यासाठी भट्टी लावली. त्यातून ३ हजार लिटर रसायन तयार करुन हातभट्टी दारु तयार केली. सामाजिक सुरक्षा विभागाला याची माहिती मिळाल्यावर त्यांनी येथे छापा टाकून हातभट्टी उद्धवस्त केली.