पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत महिला पोलीस उपनिरिक्षक नैना कंवाल सहभागी झाल्यानंतर नैना यांची जोरदार चर्चा झाली होती. मात्र त्यांना आता तुरुंगात का टाकले. याच्या पाठीमागचे नेमके काय कारण आहे ते आज आपण पाहूया..
दिल्ली पोलिस एका अपहरणाच्या प्रकरणात तपास करीत असताना, त्याचे धागेदोरे नैना कंवलपर्यंत येऊन पोहोचले. दिल्ली पोलिसांनी नैनाच्या रोहतकमधल्या फ्लॅटवर छापा मारला. तिच्या घरात पोलिसांना बिना लायसन्सची दोन पिस्तुले सापडली. पण पोलिसांना बघताच नैनाने घराच्या खिडकीत पिस्तूल खाली फेकून दिले. पोलिसांनी ही पिस्तुले जप्त केली. त्यानंतर या प्रकरणात नैनावर अवैध शस्त्र ठेवल्याप्रकरणी शस्त्रास्त्र कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर नैना कंवलला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने तिला तुरुंगात टाकण्याची शिक्षा सुनावली.
नैना कंवल कोण आहे
नैना कंवल (रा. सोनपीत, हरियाणा) ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची रेसलर आहे. नैनाने क्रीडा क्षेत्रात आपल्या कामगिरीची छाप उमटवली आहे. एशियन चॅम्पियनशिपमध्ये तीने गोल्ड मेडलची कमाई केली आहे. तसेच तिने ६ वेळा भारत केसरी आणि ७ वेळा हरियाणा केसरीचा मान पटकावला आहे. क्रीडा क्षेत्रातील चांगल्या कामगिरीनंतर तिला २०२२ मध्ये राजस्थान सरकारमध्ये स्पोर्ट्स कोट्यातून सब इन्स्पेक्टरची नोकरी मिळाली. पण याच गणवेशामुळे तिला आज तुरुंगाची हवा खावी लागत आहे.
दरम्यान, नैना सोशल मीडियावरही सक्रिय असते. सोशल मीडियावर तीचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती आपले फिटनेसचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, त्याला लोकांची चांगलीच पसंती मिळते. याशिवाय तिच्या सौंदर्याचेही लाखो फॅन्स आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्यानंतर नैना कंवाल यांची जोरदार चर्चा झाली होती.