भिगवण, (पुणे) : पुणे सोलापूर महामार्गावरील लोंढेवस्ती (ता. इंदापूर) ग्रामपंचायत हद्दीत ट्रकने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीवरील 24 वर्षीय विवाहित महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पती गंभीर जखमी झाले असून 4 वर्षाच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली आहे. बुधवारी (ता. 07) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
सोनाली अविनाश लकडे (वय 24, रा. कात्रज, (कांचनपुरी नगरी) ता. करमाळा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. तर पती अविनाश नामदेव लकडे (वय 29) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात शरवीर अविनाश लकडे हा मुलगा बचावला आहे. अपघात एवढा भीषण होतां की, महामार्गावरून दुचाकी ट्रकने जवळपास दहा ते बारा फूट थेट वनीकरणात फरफटत नेली. यामध्येच सोनालीचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी मालवाहू ट्रक (क्र. एमएच 42 टी 2320) हा पुण्याकडून इंदापूरच्या दिशेने वेगाने निघाला होता. याच मार्गावरून भिगवण नजीकच्या कात्रज (ता. करमाळा) येथील हे दांपत्य अविनाश लकडे हे त्यांच्या जवळ असलेली दुचाकीवरून पत्नी व मुलासह इंदापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी भरधाव ट्रकने पाठीमागून दुचाकीला जोरात धडक दिली.
दरम्यान, हा अपघात एवढा भीषण होता की, महामार्गावरून दुचाकी स्वाराची दुचाकी ट्रकने जवळपास दहा ते बारा फुट थेट वनीकरणात फरफटत नेली. यात दुचाकीवरील सोनाली लकडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीचालक गंभीर जखमी झाले आहेत. तर या अपघातात त्यांचा मुलगा हा सुखरूप वाचला.