पुणे : लोणावळ्यात पर्यटनासाठी आलेल्या एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती भुशी धरणात बुडाल्याची धक्कादायक घटनाघडली आहे. यामध्ये २ महिला आणि ३ मुलांचा समावेश आहे. हि घटना आज ३० जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि लोणावळा शहर पोलिसांच्या वतीने शोध मोहीम सुरू करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा परिसरात भुशी धरणाच्या बॅकवॉटरजवळील धबधब्यात पिकनिकसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. एका महिला आणि चार मुलांचा यामध्ये समावेश आहे. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल या ठिकाणाहून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले असल्याची माहिती लोणावळा पोलिसांनी दिली आहे.
शिवदुर्ग मित्र आणि लोणावळा शहर पोलिसांचे शोध आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य युद्धपातळीवर सुरु असून यातील दोन महिलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहेत.
दरम्यान, पर्यटकांची पंढरी असलेल्या लोणावळ्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील प्रसिद्ध भुशी डॅम ओव्हर फ्लो झाला आहे. या डॅमच्या ठिकाणी आज रविवारी सुट्टी असल्याने मोठ्या प्रमाणात पर्यटकांननी मोठी गर्दी केली आहे. अशातच आज एकाच कुटुंबातील पाचजण वाहून गेले आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.