Pune News : अखिल भारतीय आयुषच्या पदवीत्तर प्रवेश परीक्षेचे क्लास घेण्याच्या नावाखाली शिक्षकाने महिलेशी अश्लिल वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात उघडकीस समोर आला आहे. याप्रकरणी शिक्षकावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)
शिक्षकावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रविराज मोरे (वय-५०, रा. मथुरा कॉम्प्लेक्स, राष्ट्रभूषण चौक, घोरपडी पेठ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सदाशिव पेठेत राहणार्या एका २६ वर्षाच्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रविराज मोरे हा भारतीय आयुष संस्थेच्या पदवीत्तर प्रवेश परीक्षांचे क्लास घेतो, असे खोटे फिर्यादी महिलेला सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी २१ हजार रुपये भरुन त्यांच्या क्लासला प्रवेश घेतला.(Pune News)
दरम्यान, फिर्यादी या क्लासला गेल्यावर आरोपीने त्यांना योन क्रिया व पुसवन विधीबद्दल माहिती आहे का? तसेच फिर्यादी यांना कामसुत्राबद्दल काहीतरी सांगा, असे म्हणाला.(Pune News) जर माहिती असेल तर अजंठा वेरुळ लेण्यात योन क्रियाच्या अनेक पोझेस आहेत तुम्ही पाहिल्या का, असे बोलून त्यांच्या शरीराचे अश्लिल पद्धतीने वर्णन केले.
त्यानंतर फिर्यादी यांनी क्लास करण्यास नकार देऊन आरोपी रविराज मोरे यांच्याकडे २१ हजार रुपये परत मागितले. तेव्हा आरोपीने पैसे परत करण्यास नकार देऊन शिवीगाळ केली. हा प्रकार करिअर डेव्हलपमोट अकॅडमी येथे १८ एप्रिल ते २० एप्रिल २०२३ दरम्यान घडला.(Pune News)
याप्रकरणी फिर्यादी यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी रविराज मोरे याच्यावर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पारखे करीत आहेत.(Pune News)