पुरंदर : कुटुंबाला गावी भेटण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाने घाला घातला आहे. उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने पुरंदर तालुक्यातील मांडकीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भोर तालुक्यातील सारोळा नजीक न्हावी-भोंगवली येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. येथील सुधीर शिवाजी जगताप (वय-३५, रा. मांडकी, ता. पुरंदर, जि. पुणे) असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सुधीर हा पुणे येथे एका कंपनीत कामाला आहेत. दिवस पाळीचे काम उरकून आपल्या टू व्हीलर वर कामानिमित्त गावी निघाला होता. भोर तालुक्यातील सारोळा येथे रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान पुढून आलेल्या गाडीच्या प्रकाशामुळे त्याला न दिसलेल्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातात तो गंभीर जखमी झाला, नागरिकांनी तातडीने जवळच्या जोगळेकर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी व दोन लहान मुले आहेत. आई-वडील गावी शेती करतात, त्यांची भेट घेण्यासाठी तो आपल्या मूळ गावी मांडकी येथे निघाला होता. प्रवासादरम्यानच त्याच्यावर काळाची झडप बसली असून यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मांडकी गावावर शोककळा पसरली आहे.
एकलहरे येथे एसटी बसला धडकून माजी सैनिकाचा मृत्यू
आंबेगाव तालुक्यातील एकलहरे हद्दीतील पुणे-नाशिक महामार्गावर कळंब बायपासजवळ एसटी बसला धडक बसल्याने दुचाकीवरील माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि. १२) रात्री १० वाजता घडला आहे. याप्रकरणी मृत माजी सैनिकावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीपकुमार ज्ञानेश्वर सूर्यवंशी (वय ४६, रा. तडसर, ता. कडेगाव, जि. सांगली) असे या अपघातात ठार झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे. याप्रकरणी विलास सयाजी कापडणे यांनी फिर्याद दिली आहे.