इंदापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. अशातच इंदापूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे इंदापूर दौऱ्यावर होते. मात्र शरद पवार यांचा दौरा आटोपताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला या मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नाराज नेते अप्पासाहेब जगदाळे यांनी शरद पवार यांची साथ सोडत इंदापूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
हर्षवर्धन पाटील यांना दिलेल्या उमेदवारीवरून जगदाळेंनी नाराजी व्यक्त केली होती. जनतेसमोर खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला साथ देणार नाही, असं जगदाळे यांनी म्हटलं होतं, त्यानंतर आज त्यांनी भरणे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षातील नाराज असलेले इंदापुरातील पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळेंनी मोठा राजकीय निर्णय घेतला असून याचा फटका शरद पवार गटाला बसणार आहे. आप्पासाहेब जगदाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
आप्पासाहेब जगदाळे आता अजित पवार गटात पक्षप्रवेश करणार असून ते उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात जगदाळे हे आता दत्तात्रय भरणे यांचा प्रचार करणार आहेत. जनतेसमोर खोटं बोलणार्या व्यक्तीला साथ देणार नसल्याच सांगत त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यानंतर त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. जगदाळे यांच्या या भूमिकेमुळे इंदापुरात शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे.