राहुलकुमार अवचट
यवत – केडगाव (ता. दौंड) येथील सामाजिक कार्यकर्ते धनराज मासाळ व त्यांच्या सहकाऱ्यानीं गेल्या २ दिवसापासून एक चांगला अनोखा उपक्रम हाती घेतला असून त्यांनी मकरसंक्रांतीचे औचित्य साधून मोल- मजुरीसाठी , ऊसतोडीसाठी बाहेरगावाहून आलेल्या महिलांची पण मकरसंक्रांत गोड व्हावी तसेच त्यांनी पण हा सण आनंदाने साजरा करावा यासाठी २०० साड्या चे वाटप करून खऱ्या अर्थाने या ऊसतोड महिलांची मकरसंक्रांत गोड केली आहे.
गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांनी व्हॉट्सॲप ग्रुप मार्फत अनेकांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला श्री स्वामी समर्थ मठ (बावीस फाटा ), केडगाव हेल्पसेंटर (व्हाट्सअप ग्रुप) व जिवलगा महिला बचत गटाने त्यांना भरघोस अशी मदत केली. या मदतीतुन त्यांनी केडगाव , खुटबाव, बोरीपार्धी, देशमुखमळा , शेळके वस्ती, २२ फाटा, हंडाळवाडी येथील मजुरांच्या राहुट्यांवर जाऊन साड्याचे वाटप केले.
दरम्यान, या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला असून पुढील वर्षी अजून जास्त महिलांपर्यंत पोहचण्याचा आमचा मानस असल्याचे धनराज मासाळ यांनी सांगितले त्यांच्या या उपक्रमाचे केडगाव परिसर व तालुक्यातील सर्वच स्तरातून खूप कौतुक होत आहे.
या साडीवाटप कार्यक्रमासाठी संजय गरदडे, राहुल महाराज राऊत, पाराजी हंडाळ, निखिल थोरात, नंदिनी गायकवाड, किशोर सातपुते, कानिफनाथ मांडगे, राहुल भणभने, शरद शेळके, जिवलगा महिला बचत गटाच्या सर्व महिलाभगिनी उपस्थित होत्या.