पुणे : Helmet News – पुणेकरांनी दुचाकी वाहन चालवताना चालकाने आणि मागे बसणाऱ्यानेही हेल्मेट (Helmet News) परिधान करावे. असे आवाहन अनेक वेळा वाहतूक विभागाने केले आहे. आता मात्र एक वाहतूक पोलिसाने चक्क एक शक्कल करत हेल्मेट परिधान करण्याबाबत जनजागृती केली आहे. (Helmet News)
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
शहारसह उपनगरात बाहतूकीचा बोजवारा उडालेला आहे. रस्त्यावर बेशिस्त वाहनचालकांची संख्या कमी नाही. त्यात शहरातील रस्त्यांवर खड्डे चुकवत वाहन चालवणे म्हणजे मोठे दिव्याचे काम झाले. वाढती वाहनांची संख्या आणि अपघातात मृत्यूमुखी पडणारी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
त्यामुळे सरकारकडून हेल्मेट सक्ती केली जाते. त्यासाठी जनजागृती देखील केली जाते. मात्र पुणेकरांनी हेल्मेट ऐवजी पगडी परिधान करुन हेल्मेट सक्तीला विरोध केला. पुणेकरांपुढे सरकारी हतबल झाले. मात्र वाहतूक पोलिस वाहतूक नियमानुसार विना हेल्मेट वाहनचालकावर कारवाई करतानाद दिसून येतात.
हेल्मेट जनजागृतीसाठी एका वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्याने चक्क पाळीव श्वानाला हेल्मट घालून जनजागृती केली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
पुणे वाहतूक विभागाचे पोलिस नाईक आतिश खराडे असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या या कार्याचे पोलीस पथकाकडून तसेच नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
पुण्यात हेल्मेट सक्तीला विरोध….
पुण्यामध्ये हेल्मेट सक्तीला विरोध करण्यासाठी हेल्मेट विरोधी कृती समितीतर्फे पगडी, फेटे घालून सविनय कायदेभंगाचं आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी सर्वपक्षीय नेते, स्वयंसेवी कार्यकर्ते सहभागी झाले होते. हेल्मेट घालणे हा कायदा झाला आहे, तो मोडण्यासाठी हेल्मेटऐवजी पगडी, फेटे घालून यासगळ्यांनी आंदोलन केले होते. मात्र पुणेकरांनी सुरू केलेल्या या आंदोलनावर वाहतूक पोलीसांनी करडी नजर ठेवत कारवाईचा बडगा उगारला होता.