सागर जगदाळे
भिगवण : भिगवण येथील भैरवनाथ विद्यालयातील १९९९-२००० च्या बॅचचे दहावीचे माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने तब्बल २४ वर्षांनंतर पुन्हा भेटले. गतकाळातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थी जुन्या आठवणीत रममाण झाले. प्रत्येकजण आपली शाळा मोठ्या आपुलकीने डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. जुने वर्ग मित्र-मैत्रिणी भेटल्याचा आनंद सर्वांच्याच चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता.
या शाळेमुळे व शिक्षकांमुळेच आपण घडल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. सर्व माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेटवस्तू दिल्या. तसेच शाळेसाठी डेस्क व सोफा सेट भेट देण्यात आला.
मनोज दराडे, पूनम खाटेर, स्वाती वाघ, प्रगती पिसाळ, जाफर मुलानी, प्रवीण खिलारे यांनी मनोगत व्यक्त केले. सुदाम काळे, अमोल लंबाते, महेश शेंडगे, दीपाली क्षीरसागर, शिल्पा गाडवे, शेखर झिटे, संतोष कांबळे, विकास ढवळे, योगेश जाधव, सागर ढेरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
या वेळी रामचंद्र बचुटे, प्रा. बिराजदार, इंनुसराव दराडे, अरुण कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक भोसले, बबन वायसे, काका देवकाते, मीना जाधव, विद्या भगत, राणी कांबळे, सारिका बंडगर, शैला बंडगर, वंदना बंडगर, रेखा राऊत, ज्योती जगदाळे, आशा वाघ, राणी वाघ, राणी खानवरे, सुंदर कुसाळकर, अमित दराडे, नवनाथ नरुटे, ऋषिकेश यादव, मोसीन आत्तार, रवी बालटकर, अमोल बंडगर, प्रवीण गाडे, सुदर्शन पुजारी, महेंद्र कोकरे, हेमंत रेडे, हरिभाऊ बंडगर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अखेरीस पाणावलेल्या डोळ्यांनी सर्वांनी एकमोकांचा निरोप घेतला.