राहुलकुमार अवचट
यवत : लडकतवाडी येथे अल्पवयीन मुलाने मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, २ नोव्हेंबर रोजी लडकतवाडी गावच्या हद्दीतील गवळीबा मंदिरात विनायक उर्फ बाळा नवनाथ दुर्गे याने नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतला. याबाबत महेश रोहिदास दुर्गे याला त्याची आई शकुंतला दुर्गे यांनी फोनवरून माहिती दिली. माहिती मिळताच महेश दुर्गे यांनी वरंवड येथून लडकतवाडी येथे गवळीबा मंदिरात येऊन पाहिले असता, बाळा नवनाथ दुर्गे (वय १७) गवळीबा मंदिरातील हुकाला गळफास घेऊन लटकत असल्याचे दिसले.
याबाबतची माहिती पोलिसांना दिली असता, पोलिसांच्या मदतीने विनायक ऊर्फ बाळा याला यवत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबत महेश दुर्गे यांनी यवत पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून, याबाबतचा पुढील तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय शेळके करीत आहेत.