हिंजवडी : पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अशीच एक घटना हिंजवडीमधील लक्ष्मी चौक येथे घडली आहे. भर दिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सला लुटण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडीमधील लक्ष्मी चौक या ठिकाणी असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानात शुक्रवार (दि.2) सकाळच्या सुमारास तीन चोरटे शिरले, त्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. घटनेनंतर हिंजवडी पोलीस आणि गुन्हे शाखा घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आज (दि.02) शुक्रवारी सकाळी शिवमुद्रा ज्वेलर्स दुकानात पिस्तुलाचा धाक दाखवून सोने- चांदीचे दागिने चोरांनी लुटले आहे. यावेळी ज्वेलर्सच्या दुकानात तीन जण शिरल्यानंतर त्यापैकी एका चोराने दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवला. त्यानंतर हुज्जत घालली. तसेच दुकानदाराला धक्काबुक्की करण्यात आली. मग सोने- चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
त्यावेळी ज्वेलर्सच्या दुकानात तिघेजण शिरल्यानंतर त्यावेळी एकाने दुकानदाराला पिस्तुलाचा धाक दाखवला. हुज्जत घालण्यात आली, दुकानदाराला मारहाण करण्यात आली. मग, दोघांनी सोने- चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. भर दिवसा ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.