-अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुर येथे महाविद्यालयीन तरुणीला धमकी देत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपीवर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल दिगंबर कांबळे (रा. तर्डोबाची वाडी ता. शिरुर जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेणारी तरुणी तिच्या मैत्रिणीसह घरी निघाली होती. त्यावेळी पाठीमागून एम एच 12 एस डब्ल्यू 8692 या दुचाकीहून आलेल्या आरोपी राहुल कांबळे याने तरुणीचा पाठलाग करत तरुणीच्या दुचाकीला अडवून तिला शिवीगाळ केला. तसेच तुझे अश्लील फोटो बनवून ते व्हायरल करुन तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केला. याबाबत पिडीत तरुणीने शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी राहुल कांबळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार दिपक राऊत हे करत आहेत.