Thursday, September 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जेवणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून डोक्यात घातली फरशी; नारायण पेठेतील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 9 November 2024, 15:20

पुणे : पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. दारु पिल्यानंतर जेवणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून डोक्यात फरशी मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना 6 नोव्हेंबर रोजी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास भिडे पुलाकडे जाणार्‍या रस्त्यावरील पत्र्याच्या खोलीमध्ये घडली आहे. या प्रकरणी मृत्युंजय शंकर सिंग (वय- ३९, रा. भिडे पुलाजवळ, नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून आश्विन यादव याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे झारखंड येथील राहणारे आहेत. गेल्या ६ महिन्यांपासून भिडे पुलाजवळील गफूर पठाण यांचे बी. पी. कन्स्ट्रकशनचे बांधकाम सुरु आहे. इमारतीमध्ये ठेकेदार अप्पा कांबळे याच्यामार्फत हे दोघेजण बांधकाम मजूर म्हणून सेट्रिंगचे काम करत आहेत. तेथे तात्पुरत्या स्वरुपात बांधलेल्या पत्र्याचे खोलीत राहतात. त्यांच्या शेजारच्या खोलीत संदीप कुमार व त्यांचा सहकारी आश्विन यादव हे रहातात. बुधवारी रात्री पावणे दहा वाजता संदिप कुमार व आश्विन यादव हे दोघे दारु पित बसले होते. त्यावेळी त्यांच्यात जेवणावरुन आपसात भांडण सुरु होते.

दरम्यान, आश्विन यादव हा संदीपकुमार याला शिवीगाळ करत होता. तेरा बहोत हो गया नाटक, तुझे आज छोडूगा नही, तेरा खेल आज खतम कर देता, असे म्हणून धमकी देत होता. त्यावेळी फिर्यादी व राहुल सोनकांबळे यांनी त्या दोघांचे भांडण सोडविले. त्यानंतर संदीपकुमार हा रुममधून बाहेर पडून बांधकाम साईटच्या खाली भिडे पुलाकडे निघाला. त्यावेळी आश्विन यादव हा देखील संदीप कुमार याच्या मागे धावत गेला.

मात्र, त्याने वाटेत पडलेली फरशी हातात घेऊन जादा बोलता है आज तेरा खेल खतम असे म्हणून संदीप कुमार याच्या डोक्यात मागून हातातील फरशी जोराने मारली. त्यामुळे संदीपकुमार खाली पडला. तेव्हा आश्विन याने पुन्हा त्याच्या फरशी डोक्यात मारली. आणि तेथून तो पळून गेला. फिर्यादी व इतरांनी संदीपकुमार याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वाती भराड करीत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ठिकठिकाणी नृत्याचे कार्यक्रम करायची अन् नंबर बदलून पसार व्हायची! राणीला पकडायला पोलिसही मजूर बनले; वाचा सिनेस्टाइल कारवाईचा थरार…

Thursday, 3 September 2026, 19:26

विद्यानंद बापटांच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांचा तातडीचा आदेश; 24 तास पोलिसांचा बंदोबस्त

Thursday, 3 September 2026, 18:58

रायगडमध्ये काँग्रेस तालुकाध्यक्षाच्या भावाची निर्घृण हत्या! डोक्यात पोकलेनचा ब्रेकर मारून खून; नातेवाईकच निघाले मारेकरी

Thursday, 3 September 2026, 18:47

दौंड हादरलं! आईसोबतच्या भांडणाचा राग चिमुकलीवर काढला; हत्या करून नराधमाने विहिरीत ढकललं अन्…

Thursday, 3 September 2026, 18:19

राघव चड्ढांना मोठा धक्का! मसुदा मतदार यादीतून नाव गायब; राज्यसभा खासदारकीवर टांगती तलवार

Thursday, 3 September 2026, 17:48

‘पैसे दे कारवाई थांबवतो’ पुण्यात अनधिकृत पानटपरीवर कारवाई टाळण्यासाठी चक्क ३०० रुपयांची लाच घेणारा पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

Thursday, 3 September 2026, 17:21
Next Post

शिक्रापूर परिसरातील ११६ परवानाधारकांची शस्त्रे जमा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp