इंदापूर (पुणे) : समुद्रात अनेक प्रकारचे मासे सापडता. कमी जास्त लांबीचे मासे नेहमीच सापडत असतात. अगदी मोठा मासा काठावर आढल्याचेही आपण ऐकले आहे. त्याच प्रमाणेउजनी पाणलोट क्षेत्रात देखील मासे मोठ्या संख्येने आढळतात. येथी माशांची चव देखील प्रसिध्द आहे. पाणलोट क्षेत्रात देखील वेगवेगळ्या प्रकराचे मासे सापडत असतात.
असाच एक मासा पहिल्यांदाच मच्छिमारांच्या जाळ्यात आज ३० किलो वजनाचा सिल्व्हर जातीचा मासा सापडला आहे. या माशाला प्रतिकिलो १८० रुपये प्रमाणे त्याला ५ हजार ४०० रुपये दर मिळाला असल्याची माहिती आहे.
गोपाळ रजपूत व कृष्णा राजपूत यांना हा मासा मिळाला होता. इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मासळी बाजारातील तेजश्री फिश मार्केट या आडत दुकानाचे मालक दत्तात्रय व्यवहारे यांनी तो विकत घेतला. सिल्व्हर जातीतील एवढा मोठा मासा मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे त्यांनी माध्यमांना सांगितले.