हडपसर : येथील कमल वसंतराव महाडीक (वय – ८७) यांचे मंगळवारी (ता. ०३) वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
कमल महाडिक यांचा अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक संस्थांशी अगदी जवळून संबंध होते. महिलांचे सबलीकरणासाठी अनेक उपक्रम त्यांनी राबविले. हस्त कौशल्य वर्ग, भजनी मंडळ आदींचा यामध्ये समावेश आहे.
हडपसर येथील प्रसिद्ध वकील ॲड. विजय वसंतराव महाडीक यांच्या मातोश्री व कै. ॲड वसंतराव नरहर महाडीक यांच्या त्या पत्नी होत.