पुणे : पुण्यातील लोणीकंद परिसरात एक अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव डंपरने दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक दिल्याची घटना घडली आहे. हि घटना रविवारी सकाळी नगर रस्त्यावर घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर डंपरचालक पसार झाला असून, लोणीकंद पोलिस त्याचा शोध घेत आहेत. श्रीचंदना विश्वनाथ हेक्टम (वय-३२ ,रा. न्याती इलॉन, वाघोली, मूळ रा. आंध्र प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर अपघातात दुचाकीस्वार विश्वनाथ गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार हेक्टम दाम्पत्य रविवारी सकाळी बॅडमिंटन खेळायला गेले होते. सकाळी दहाच्या सुमारास बॅडमिंटन खेळून हेक्टर दाम्पत्य परत घरी निघाले होते. नगर रस्त्यावर चितळे मिठाई दुकानासमोर भरधाव डंपरने दुचाकीस्वार हेक्टर दाम्पत्याला जोरदार धडक दिली. डंपरच्या चाकाखाली सापडून श्रीचंदना यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पसार झालेल्या डंपरचालकाचा शोध सुरु आहे.